काबूलमध्ये नमाजानंतर भीषण स्फोट; 10 जणांचा मृत्यू

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
bomb blast b
bomb blast bSakal

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील (Kabul) एका मशिदीत (Majjid) आज झालेल्या भीषण स्फोटात (Bomb Blast) किमान 10 जण ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. मुस्लिमांच्या पवित्र रमजान (Ramjan) महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी शेकडो लोक नमाज अदा करण्यासाठी जमले होते त्यावेळी हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Blast In Kabul )

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद नफी तकोर यांनी सांगितले की, घटनेनंतर तालिबानी सुरक्षा कर्मचार्‍यांनी परिसराला वेढा घातला असून, अद्याप कोणीही या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोट इतका भीषण होता की, मशिदीच्या आजूबाजूच्या इमारती हादरल्याचे स्थानिकांनी सांगितले. शुक्रवारच्या नमाजानंतर दोन तासांनी हा स्फोट झाला, जेव्हा तेथे मोठ्या संख्येने लोक जमले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com