esakal | काबूल: नॉर्वेच्या दूतावासावर तालिबानचा ताबा
sakal

बोलून बातमी शोधा

kabul

काबूल: नॉर्वेच्या दूतावासावर तालिबानचा ताबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल: तालिबानच्या दहशतवाद्यांनी काबूल येथील नॉर्वेचा दूतावास आज ताब्यात घेतला. दूतावासात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी कार्यालयातील दारूच्या बाटल्या फोडल्या आणि मुलांची पुस्तकही फाडली. या संदर्भातील माहिती इराणमधील नॉर्वेचे राजदूत सिगवाल्ड हेग यांनी ट्विट करून दिली.

हेही वाचा: अफगाणिस्तानात पत्रकारांवरही बंधन? आंदोलनाचं रिपोर्टिंग पडलं महागात

नॉर्वेच्या दूतावासात तालिबानचे दहशतवादी बंदूक घेऊन घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तत्पूर्वी हेरत शहरात तेथील गर्व्हनर हाऊसमध्ये असलेल्या दारूच्या बाटल्या तालिबानने फोडल्या होत्या. संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानने सरकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला आहे.

यानुसार नॉर्वे दूतावासावर तालिबानने ताबा मिळवला. तेथील दारूच्या बाटल्या आणि पुस्तकांची नासधूस केली. ट्विटमध्ये सिगवाल्ड यांनी म्हटले की, ‘‘हा दूतावास नंतर परत करू, असे ते म्हणत आहेत. त्यांना दारूच्या बाटल्या फोडायच्या आहेत आणि मुलांची पुस्तकही नष्ट करायची आहेत. जोपर्यंत संपूर्ण बाटल्या फोडल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही दुतावासाबाहेर येणार नाही, असे तालिबान म्हणत आहे.’’

अहमद शाह मसूदच्या समाधीस्थळाची हानी

दुसरीकडे तालिबानने अहमद शाह मसूदच्या मकबऱ्याची तोडफोड केली. यासंदर्भातील छायाचित्र स्थानिक माध्यमांनी प्रकाशित केले. यात समाधीस्थळाची हानी झालेली असते. अहमद शाह मसूद यांना पंजशीरचा सिंह म्हटले जाते.

त्यांनी १९८९ रोजी सोव्हिएत संघाचा पराभव केला होता. त्यानंतर तालिबानने आपली व्याप्ती वाढवली. १९९० च्या दशकात जेव्हा अफगाणिस्तानात सत्ता स्थापन केली तेव्हा अहमद शाह मसूद यांनी तालिबानविरोधात युद्ध पुकारले. ९ डिसेंबर २००१ मध्ये एका हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

loading image
go to top