esakal | अफगाणिस्तानात पत्रकारांवरही बंधन? आंदोलनाचं रिपोर्टिंग पडलं महागात
sakal

बोलून बातमी शोधा

Protest in Kabul

अफगाणिस्तानात पत्रकारांवरही बंधन? आंदोलनाचं रिपोर्टिंग पडलं महागात

sakal_logo
By
सुधीर काकडे

तालिबान (Taliban) सध्या अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सत्तास्थापनेची तयारी करत असताना दुसरीकडे अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये मोठी अराजकता असल्याचे दिसते आहे. राजधानी काबूलमध्ये या अराजकतेचे परिणाम आंदोलनाच्या स्वरुपात पाहायला मिळता आहेत. मंगळवारी काबूलमध्ये अफगाणी पाकिस्तानी दुतावासासमोर अफगाणी महिलांनी आंदोलन केले, त्यावर तालिबानने बेछूट गोळीबार करत विरोध झुगारुन लावण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता तालिबान्यांनी हे आंदोलन कव्हर करणाऱ्या पत्रकारांना देखील अटक केल्याची माहिती मिळते आहे.

अफगाणी महिलांनी मंगळवारी राजधानी काबूलमध्ये असणाऱ्या पाकिस्तानी दुतावासासमोर आंदोलन केले. पाकिस्तान देशाच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरु असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी या आंदोलनाचं रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकारांना तालिबान्यांनी अटक केली. अटक केल्यानंतर या पत्रकारांना मारहाण (Journalists Beaten by Taliban) केली. पत्राकारांना करण्यात आलेली बेदम मारहाम आणि समोर आलेले दृष्य जगाची चिंता वाढवणारे आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये माध्यमांना किती स्वातंत्र्य असेल असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

हेही वाचा: पत्रकारांनी 'दहशतवादी' म्हणणं बंद करावं, अन्यथा..

लॉस एंजलिस टाईम्सचे पत्रकार मार्कस याम यांनी हा फोटो आपल्या ट्विटर खात्यावरुन प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये दोन्ही पत्रकार अंतर्वस्त्रामध्ये असून, त्यांच्या शरीरावर मारहाण केल्याचे व्रण दिसता आहेत. एटिलातरोझचे पत्रकार नेमात नागदि आणि ताकि दरयाबि यांना, काबूलमधील महिलांच्या आंदोलनाचे रिपोर्टींग केल्याबद्दल तालिबान्यांकडून अटक करुन मारहाण करण्यात आली.

loading image
go to top