Kamala Harris: निवडणूक हरले, लढाई सुरूच..

US elections: कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्विकारला असून, समर्थकांना निवडणुकीचा निकाल स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाबद्दल अभिनंदनही केले.
Kamala Harris
Kamala Harrissakal
Updated on

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी मान्य केले आहे. तसेच, ही निवडणूक माझ्यासाठी संपली असली तरी यामुळे सुरू झालेली लढाई मात्र सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने दिलेला हा निकाल स्वीकारण्याचे आवाहनही कमला हॅरिस यांनी समर्थकांना केले आहे. तसेच, निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदनही केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com