
वॉशिंग्टन - अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीपूर्वीच्या वादविवाद चर्चेमध्ये (प्रेसिडेंट डिबेट) अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा प्रभाव फारसा पडला नाही. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींमध्ये चिंता निर्माण झाली असून बायडेन यांनी उमेदवारी मागे घेण्याची मागणी होऊ लागली आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या ‘प्रेसिडेंट डिबेट’मध्ये बहुतेक माध्यम समूहांनी ट्रम्प यांनाच विजयी घोषित केले आहे. वादविवादातील ९० मिनिटांच्या चर्चेत बायडेन यांचे अडखळणे आणि वाढते वय कालच्या चर्चेतून प्रकर्षाने दिसले. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमकपणे बोलले असले तरी त्यात अवास्तव आणि खोटेपणा होता.
ट्रम्प यांच्या चारित्र्यामुळेही नाराजी असून त्यांच्या हातात पुन्हा अमेरिकेचे नेतृत्व जाऊ नये, असे डेमॉक्रॅटिकच्या सदस्यांना वाटत आहे. यातून बायडेन यांना पर्याय म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या नावाचा आग्रह होऊ लागला आहे.
‘डेमॉक्रॅटिक’ने बायडेन यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नसल्याने पक्ष उमेदवार बदलू शकतो. ‘चर्चेत बायडेन यांची सुरुवात अडखळत झाली, अशी कबुली कमला हॅरिस यांनीही काल दिली होती. शेवट मात्र अत्यंत प्रभावीपणे केला, असेही त्या म्हणाल्या होत्या.
रिपब्लिकनकडून खिल्ली
हॅरिस यांच्या उमेदवारीवर ‘रिपब्लिकन’ने राजकारण सुरू केले आहे. हॅरिस हे बायडेन यांच्या मानगुटीवर बसलेले भूत असून त्यांना मत देणे म्हणजे हॅरिस यांच्यासाठी आहे, असा युक्तिवाद पक्ष करू लागला आहे. बायडेन यांच्या प्रचारयंत्रणा या मुद्दाकडे लक्ष देऊन हॅरिसला यांना प्रत्येक वेळी पुढे केले पाहिजे. बायडेन जे करू शकत नाहीत, ते त्या करू शकतात. चर्चेत ट्रम्प यांच्यासमोर उभे राहून हॅरिस यांना आव्हान देऊ शकतात, असा प्रचार रिपब्लिकन पक्षाने सुरू केला आहे.
जगभरात पडसाद
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा मुकाबला करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने बायडेन यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी, असे मत अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली वृत्तपत्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी (ता.२८) अग्रलेखात व्यक्त केले आहे.
‘सीएनएन’च्या स्टुडिओत काल झालेल्या चर्चेच्या निकालाचे पडसाद जगभरात व्यक्त होत आहेत. परकीय मुत्सद्दींनांही धक्का बसला आहे. ट्रम्प निवडून आले तर सध्याच्या परराष्ट्र धोरणांत बदल होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.‘बायडेनसाठी वाईट रात्र होती, अशा प्रतिक्रिया युरोप, मध्य पूर्व आणि आशियातील मुत्सद्यांनी व्यक्त केल्याचे ‘सीएनएन’ने म्हटले आहे.
‘सीएनएन’चा कल (मतांची टक्केवारी)
डोनाल्ड ट्रम्प - ६७
ज्यो बायडेन - ३३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.