Karachi Blast: भयंकर! कराचीमध्ये भीषण स्फोट! १६ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटना नेमकी कशामुळे घडली?

Karachi Cylinder Blast News: कराचीच्या सोल्जर मार्केटमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी आहेत. बचावकार्य सुरू आहे.
Karachi Cylinder Blast

Karachi Cylinder Blast

ESakal

Updated on

पाकिस्तानातील कराची येथील एका तीन मजली इमारतीत सिलेंडरचा स्फोट होऊन किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मुलांचाही समावेश आहे. बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा सोल्जर बाजारातील गली क्रमांक ३ येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक शक्तिशाली स्फोट झाला. ज्यामुळे इमारतीचा एक भाग कोसळला. आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com