esakal | फुटीरतावादी नेत्याला पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार; हुर्रियतने स्वीकारला पण नातेवाइकांनी नाकारला
sakal

बोलून बातमी शोधा

geelani

पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशाण ए पाकिस्तान हा काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली गिलानी यांना दिला होता.

फुटीरतावादी नेत्याला पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार; हुर्रियतने स्वीकारला पण नातेवाइकांनी नाकारला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद - पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशाण ए पाकिस्तान हा काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली गिलानी यांना दिला होता. त्यांच्यावतीने हुर्रियतच्या स्थानिक नेत्यांनी पुरस्कार स्वीकारला मात्र सय्यद गिलानी यांनी तो नाकारला आहे. गिलानी यांच्या कुटुंबाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सध्या गिलानी इतके आजारी आहेत की, त्यांना काही गोष्टींमधला फरक कळत नाही. त्यांना पाकिस्तानने सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला हे समजण्याइतकी त्यांची तब्येत ठीक नाही. गिलानी यांच्या पणतीने ही माहिती दिली असून ती सध्या तुर्कीमध्ये राहते. 

हुर्रियतचे वरिष्ठ नेते गिलानी यांच्या कार्यालयाकडून 17 ऑगस्टला एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं होतं. त्यामध्ये म्हटलं होतं की, पाकिस्तानने दिलेला नागरी पुरस्कार स्वीकारलेला नाही. यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. गिलानी यांची प्रतिमा मलीन करण्याचा कट असल्याचंही म्हटलं जात होतं. दरम्यान, या वादावर हुर्रियत किंवा गिलानी यांच्या कार्यालयाकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र गिलानी यांची नातलग असलेल्या रुवा शाह यांनी ट्विटरवरून भावना व्यक्त केल्या आहेत.

सय्यद अली शाह गिलानी यांनी काश्मीर बनेगा पाकिस्तान असा नारा दिला होता. त्यांना पाकिस्तान निर्मिती दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात निशाण ए पाकिस्तानने गौरवलं. इस्लामाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमाला गिलानी स्वत: उपस्थित नव्हते. त्यांच्यावतीने स्थानिक हुर्रियत नेत्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्याच्या आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गिलानी यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तसंच इस्लामाबादमध्ये गिलानी यांच्या नावावर एक विद्यापीठ स्थापन करण्याची आणि शालेय पाठ्यपुस्तकात त्यांचा धडाही देण्याचा प्रस्ताव मांडला होता. 

loading image
go to top