
कझाकिस्तानमधील अकटाऊ शहराजवळ बुधवारी मोठी विमान दुर्घटना घडली. अझरबैजान एअरलाइन्सचे प्रवासी विमान बकू येथून रशियाच्या ग्रोजनी शहराकडे जात होते, मात्र ग्रोजनीतील धुक्यामुळे विमानाचे मार्ग बदलण्यात आले. विमानाने १०५ प्रवासी आणि पाच कर्मचाऱ्यांना घेऊन उड्डाण केले होते, मात्र दुर्दैवाने ते अकटाऊ विमानतळाजवळ कोसळले.