Viral Story : अपहरण झालेल्या किशोरवयीन मुलीची टिकटॉकमुळे सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kidnapped

याचाच प्रत्यय आलाय एका १६ वर्षीय मुलीला. सोशल मीडियावरील टिकटॉक अॅप हा तिच्यासाठी तारणहार ठरलंय.

अपहरण झालेल्या किशोरवयीन मुलीची टिकटॉकमुळे सुटका

सध्याची पिढी सोशल मीडियाच्या किती आहारी गेली आहे, हे सांगायची गरज नाही. कित्येकजणांनी तर नैराश्य येऊन आत्महत्या केल्याचंही आपण ऐकलं असेल. पण योग्य वापर केला तर सोशल मीडिया कुणाचा जीवही वाचवू शकतो. याचाच प्रत्यय आलाय एका १६ वर्षीय मुलीला. सोशल मीडियावरील टिकटॉक अॅप हा तिच्यासाठी तारणहार ठरलंय.

टिकटॉकची आवड असलेली ही सोळा वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली. ती हरवली असल्याची तक्रारही नोंदवली गेली होती. या मुलीचं अपहरण झालं होतं. दरम्यान अपहरणकर्ता तिला कारमधून नेत असताना ती काही विशिष्ट हातवारे करत होती. हे हातवारे एका व्यक्तीने पाहिले. तिच्या हाताच्या इशाऱ्यांवरून व्यक्तीच्या लक्षात आलं की ती मुलगी संकटात आहेत. त्याने ताबोडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर तिची सुटका करण्यात आली.

हेही वाचा: Blog: सोशल मीडिया.. सेलिब्रिटी.. स्वातंत्र्य

पोलिसांना या घटनेची माहिती देणाऱ्या व्यक्तीने अपहरणकर्त्याच्या गाडीचा पाठलाग करुन त्याची माहिती पोलिसांना देऊ केली. ज्या गाडीत अपहरणकर्ता त्या मुलीला घेऊन जात होता, त्या गाडीच्या पाठी तो गाडी चालवत होता. समोरच्या गाडीतील एक महिला प्रवासी हाताने हातवारे करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. घरातील हिंसाचाराबद्दल जागृत करण्यासाठी टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने 'मला घरगुती हिंसाचारासाठी मदत हवी आहे' अशा पद्धतीची जागृती केली होती. तशाच प्रकारचे हातवारे त्याला दिसल्यामुळे त्याने ९११ ला कॉल करून याची माहिती दिली की महिला अडचणीत आहे. याव्यतिरिक्त वाहन एक पुरुष चालवत असल्याचंही त्यानं सांगितले.

हेही वाचा: कोरोनाकाळात काय आहेत सोशल मीडिया ट्रेंड सर्च ; जाणून घ्या

सुटका झालेल्या १६ वर्षीय मुलीनं सांगितलं की, अपहरणकर्ता तिच्या ओळखीचा होता. त्यानं तिला नॉर्थ कॅरोलिना, टेनेसी, केंटकी या मार्गाने ओहीयोमधील नातेवाईकांकडे नेलं. तेव्हा त्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या लक्षात आले की, त्याच्या ताब्यातील मुलगी ही अल्पवयीन आहे आणि ती हरवल्याची तक्रार नोंद आहे. तेव्हा आरोपीनं ओहीयोही सोडलं आणि ओहीयोपासून साऊथबाऊंडच्या दिशेने निघाला. दरम्यान अल्पवयीन मुलीनं वाहनचालकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विशिष्ट हातवारे केले. ९११ वर कॉल करण्यासाठी वाहनचालकांचे लक्ष वेधण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांना एक फोन देखील सापडला. त्यात एक अश्लील चित्रीकरणाचा व्हिडीओही सापडला.

टिकटॉक हँड जेश्चर म्हणजे काय?

हे जेश्चर म्हणजे विशिष्ट हातवारे किंवा खुणा आहेत. एखादी व्यक्ती जेव्हा संकटात असेल, तेव्हा ती असे जेश्चर करू शकते आणि न बोलता जवळच्या व्यक्तींना सावध करू शकते. कॅनेडियन वुमेन्स फाऊंडेशनने अशा संभाव्य गैरवर्तनाचा सामना करण्यासाठी हाताच्या जेश्चरचा दीर्घकाळ प्रचार केला आहे.

पोलिसांनी आरोपी जेम्स हर्बर्ट ब्रिकला अटक केली आणि त्यानंतर न्यायालयानं त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

loading image
go to top