दुबईच्या राजाकडून स्वत:च्याच मुलींचे अपहरण

वृत्तसंस्था
शनिवार, 7 मार्च 2020

दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशिद अल मक्‍तूम (वय ७०) यांनी त्यांच्या दोन मुलींच्या अपहरणाचा आदेश दिला असल्याचा निकाल ब्रिटिश न्यायालयाने गुरुवारी (ता. ५) दिला.

लंडन - दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशिद अल मक्‍तूम (वय ७०) यांनी त्यांच्या दोन मुलींच्या अपहरणाचा आदेश दिला असल्याचा निकाल ब्रिटिश न्यायालयाने गुरुवारी (ता. ५) दिला. तसेच आपल्या पूर्व पत्नीला भीती आणि धमकावून लंडनला जाण्यास भाग पाडले, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पती शेख मक्तूम यांच्या भीतीमुळे राजकुमारी हया बिन्त अल हुसेन (वय ४५) या गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संयुक्‍त अरब अमिरातीला (यूएई) पळून गेल्या. मक्तूम हे ‘यूएई’चे उपाध्यक्ष आणि पंतप्रधानही आहेत.

हॉटेलमधून मागवलेल्या मांसात निघाला मानवी दात...

ब्रिटनचे न्यायालयाचे न्यायाधीश अँड्रू मॅकफारलेन यांनी राजकुमारी हया यांच्या अर्जावरील सुनावणीत म्हटले आहे की, मक्तूम यांनी त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी हया यांना धमकाविण्यासाठी मोहीमच आखली होती. त्यांच्या अपहरणाचा कट मक्तूम यांनी आखून ते किती आक्रमक आहेत, हे दाखवून दिले आहे. 

भारताच्या नजीक पकडले होते
मक्तूम यांची मुलगी शेईखा शमसा हिला २०००मध्ये केंब्रिजहून पळवून दुबईला आणले होते. त्या वेळी ती १९ वर्षांची होती. शमसाची लहान बहीण लतिफा (सध्याचे वय ३५) हिला २००२ आणि २०१८ असे दोनदा पकडून दुबईला आणले होते. लतिफाने २०१८ मध्ये दुबईहून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा भारताच्या नजीक समुद्रातून दुबईच्या नौदलाने तिला ताब्यात घेतले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The kidnapping of his own daughters from the King of Dubai