किम जोंग उन भावूक होतात तेव्हा; लष्करी कार्यक्रमात हुकूमशहा झाला हळवा

वृत्तसंस्था
Wednesday, 14 October 2020

देशासाठी बलिदान देणारे सैनिक आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात अपयश आले अशांची माफी मागताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. तब्बल आठवडाभरापूर्वीचा त्यांचा हा व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

सेऊल - क्रौर्य आणि तितक्याच कडवट स्वभावासाठी जगभर कुख्यात असलेले उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे लष्करी कवायतीसमोर मार्गदर्शन करताना विशेष भावूक झालेले दिसले. देशासाठी बलिदान देणारे सैनिक आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात अपयश आले अशांची माफी मागताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. तब्बल आठवडाभरापूर्वीचा त्यांचा हा व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वर्कर्स पार्टीच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना किम भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वादळाचा सामना करताना आणि कोरोनाशी दोन हात करताना कोरियन लष्कराने दाखविलेल्या धाडसाला देखील त्यांनी सलाम केला.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एका कोरियन दूरचित्रवाणी वाहिनीवरून या कार्यक्रमाचे फुटेज नुकतेच व्हायरल झाले आहे. ‘‘ माझे प्रयत्न आणि प्रामाणिकपणा यामुळे लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होऊ शकले नाहीत, आमच्या लोकांनी माझ्यावर नेहमीच विश्‍वास ठेवला, मला पाठिंबा दिला, माझ्या आवडीनिवडींचे देखील समर्थन केले.’’ अशा शब्दांत त्यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kim Jong un cries video goes viral

Tags
टॉपिकस
Topic Tags: