

Kim Jong Un military drills missile test
esakal
North Korea missile launch news : उत्तर कोरियाने युद्धनौकेवरून क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. या चाचण्यावेळी देशाचे नेते किम जोंग उन उपस्थित होते. सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, त्यांच्या कन्या किम जू ई हीदेखील या वेळी उपस्थित होती.
उत्तर कोरियाच्या पश्चिम किनाऱ्यावरून करण्यात आलेल्या या चाचणीत क्षेपणास्त्रांनी निर्धारित लक्ष्य अचूकपणे भेदल्याचा दावा सरकारी माध्यमांनी केला आहे. या चाचण्यांमुळे उत्तर कोरियाची सागरी युद्धक्षमता अधिक मजबूत झाल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, युनायटेट स्टेट आणि साउथ कोरिया यांच्या संयुक्त लष्करी सरावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने या चाचण्या केल्याचे मानले जात आहे. या सरावाला प्रत्युत्तर देण्यासाठीच ही कारवाई करण्यात आल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
यावेळी बोलताना किम जोंग उन यांनी देशाने अण्वस्त्रांच्या साह्याने कोणत्याही धोक्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता कायम राखणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच देशाची संरक्षण क्षमता अधिक बळकट करण्यासाठी अशा चाचण्या पुढेही सुरू राहतील, असे संकेत त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.