North Korea : किम जोंग उनची गुपितं संपेनातच! सिक्रेट मुलगीही आली समोर? भर कार्यक्रमात...

या कार्यक्रमात किम जोंग उन आणि त्यांची पत्नी री सोल जू हेही सहभागी झाले होते.
Kim Jong Un with Daughter
Kim Jong Un with DaughterSakal
Updated on: 

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन हा जगातल्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहे. त्याच्याविषयी कोणत्याच गोष्टी फारश्या स्पष्ट झालेल्या नाहीत. त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी सगळं जग उत्सुक असतं. त्याच्या वैयक्तिक आय़ुष्याबद्दलही अनेक गुपितं आहेत. त्यातलंच एक गुपित फुटल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Kim Jong Un with Daughter
Ratan Tata : माझा सर्वोच्च आनंद कोणता? ८४ वर्षांच्या तरुणाचं उत्तर ऐकून तुम्हीही आळस झटकाल!

सोशल मीडियावर किम जोंग उन याच्या मुलीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. उत्तर कोरियामध्ये एका कार्यक्रमादरम्यान टीव्हीवर दिसणाऱ्या एका मुलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक लोकांना असं वाटतंय की मुलगी किम जोंग उन यांची सिक्रेट मुलगी जू-ए आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, ही मुलगी उत्तर कोरियाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इतर मुलांसोबत दिसले.

Kim Jong Un with Daughter
Shinzo Abe : जुलैमध्ये मृत्यू झालेल्या जपानच्या पंतप्रधानांवर आज अंत्यसंस्कार; काय आहे कारण?
Kim Jong Un daughter
Kim Jong Un daughterSakal

इतर मुलांसोबत ही मुलगी या कार्यक्रमात गाणंही गात होती. या कार्यक्रमात किम आणि त्यांची पत्नी री सोल जू हे देखील उपस्थित होते. री सोल जूने या मुलांपैकी काही जणांच्या पाठीवर थाप मारत त्यांना शाबासकीही दिली. या सगळ्यात किमची कथित मुलगी जू-ए मात्र शांत उभी असलेली दिसून आली. तिच्या हावभावावरुन नेटकऱ्यांना वाटलं की तिची या सगळ्यांशी चांगली ओळख आहे.

मात्र दुसरीकडे इतर सगळी मुलं किम जोंग उन यांच्या अवतीभोवती खेळताना, फिरताना दिसत आहेत. तसंच कॅमेऱ्याचा फोकसही विशेषतः या मुलीवरच होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचा जन्म २०१३ मध्ये झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Google, Amazon and OpenAI on high alert; Websites offline
piyush goyal
piyush goyal and Minister for Economic Affairs Katherina Reiche
piyush goyal
Marathi News Esakal
www.esakal.com