Shinzo Abe : जुलैमध्ये मृत्यू झालेल्या जपानच्या पंतप्रधानांवर आज अंत्यसंस्कार; काय आहे कारण?

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदीही जाणार आहेत.
Sudhindra Kulkarni writes about Shinzo Abe in my memory Kyoto arts and culture
Sudhindra Kulkarni writes about Shinzo Abe in my memory Kyoto arts and culturesakal

भर सभेत झालेल्या गोळीबारामुळे मृत्यूमुखी पडलेले जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी टोक्यो इथं दाखल झाले आहेत. शिंजो आबे यांच्या मृत्यूनंतर जवळपास तीन महिन्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार का होणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्याविषयी जाणून घ्या.

Sudhindra Kulkarni writes about Shinzo Abe in my memory Kyoto arts and culture
Shinzo Abe Death: भाषणादरम्यान झालेल्या गोळीबारात शिंजो आबे यांचं निधन

जपानमधल्या आगामी निवडणुकीसाठी प्रचार करत असताना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर ८ जुलै २०२२ रोजी गोळीबार झाला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर १५ जुलै रोजी अंत्यसंस्कार पार पडले. आता जवळपास तीन महिन्यांनंतर त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. या अंत्यसंस्कारांसाठी पंतप्रधान मोदींसह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होणार आहेत. राजकीय प्रोटोकॉलप्रमाणे हे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Sudhindra Kulkarni writes about Shinzo Abe in my memory Kyoto arts and culture
'थकलोय' असं सांगत त्याने सोडली नोकरी; कोण आहे शिंजो आबेंचा खुनी?

१९९३ मध्ये वडिलांच्या निधनानंतर शिंजो आबे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मतं मिळाली आणि शिंजो आबे यांची लोकप्रियता वाढत गेली. वयाच्या ५२ व्या वर्षी ते जपानचे पंतप्रधान झाले. जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.शिंजो आबे सर्वाधिक काळ जपानचे पंतप्रधान राहिलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com