esakal | किम जोंग अडचणीत; बहिणीकडे सोपवली मोठी जबाबदारी
sakal

बोलून बातमी शोधा

kim jong un

अण्वस्त्र नितीचे वरिष्ठ सल्लागार डुयोन किम यांनी किम जोंग यांच्या या कृतीबाबत वेगळंच मत व्यक्त केलं आहे. किम जोंग त्याचे अधिकार दुसऱ्याला देण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियात सत्तेचं आंशिक हस्तांतरण हे पटण्यासारखं नसल्याचं डुयोन म्हणाले.

किम जोंग अडचणीत; बहिणीकडे सोपवली मोठी जबाबदारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेऊल -  सध्या जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जवळपास सर्वच देशांनी लॉकडाऊन केलं. यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. उत्तर कोरियालासुद्धा मोठा फटका बसला असून आता संकटात सापडलेल्या हुकुमशहा किम जोंग यांनी बहिण किम यो जोंगवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता अमेरिकेसोबतचे संबंधही बिघडल्यानं ते सुधारण्यासाठी हे पाऊल उचचल्याचं म्हटलं जातं आहे. 

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आपली लहान बहीण किम यो जोंग हिला अघोषित उपाध्यक्ष (डी फॅक्ट सेकंड इन कमांड) बनविल्याचे वृत्त दक्षिण कोरियातील गुप्तचर संस्थेने दिले आहे. त्यांच्याकडे दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्याबरोबरील संबंधांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. किम यांच्यावरील ताण कमी व्हावा आणि अपयश आल्यास दोष पत्करावा लागू नये असे हेतू आहेत. 

हे वाचा - पुतीन यांचे कट्टर विरोधक अत्यवस्थ; उपचारांसाठी जर्मनीला हलवण्यास नकार

किम जोंगने त्यांच्या नेत्यासोबत घेतलेल्या एका बैठकीत सांगितलं की, देशाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यामुळे विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्यात अडथळे येत आहे. सध्या अर्थव्यवस्था अडचणीत असून कोरोनामुळे लादलेले प्रतिबंध हे प्रमुख कारण आहे. याशिवाय महापूराचाही फटका बसला आहे. यामुळे गेल्या दोन दशकातील सर्वात वाईट वेळ उत्तर कोरियावर आली आहे. 

उत्तर कोरियाच्या या परिस्थितीबाबत दक्षिण कोरियाच्या खासदारांनी माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, देशाच्या गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार किमने सेऊल आणि वॉशिंग्टनसोबतचे संबंध सुधारण्याची जबाबदारी लहान बहिण किम यो जोंगवर सोपवली होती. गेल्या काही दिवसांत तिने राजनैतिक प्रकरणांमध्ये भूमिका पार पाडली होती. 

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

अण्वस्त्र नितीचे वरिष्ठ सल्लागार डुयोन किम यांनी किम जोंग यांच्या या कृतीबाबत वेगळंच मत व्यक्त केलं आहे. किम जोंग त्याचे अधिकार दुसऱ्याला देण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियात सत्तेचं आंशिक हस्तांतरण हे पटण्यासारखं नसल्याचं डुयोन म्हणाले.

loading image
go to top