थायलंडमधील गुहेत अडकलेल्यांना भारतीय करतायत मदत!

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

या बचावकार्यातील भारताशी संबंधित महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांची सुटका करण्यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला मदतीची विनंती केली. भारतातील किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लड पंप्स पाठविले. भारत सरकार व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली.

चियांग राइ (थायलंड) : थायलंडच्या उत्तरेकडील थाम लुआंग नांग या गुहेत अडकलेली 12 मुले व त्यांचे एक प्रशिक्षक यांना गुहेबाहेर काढण्याचे कार्य अजूनही चालू आहे. यातील 11 जणांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश मिळाले आहे, तर दोघांना बाहेर काढण्यासाठी अद्याप प्रयत्न चालू आहेत. 23 जून रोजी बारा मुले व त्यांचे 25 वर्षीय प्रशिक्षक फुटबॉल खेळण्यासाठी या भागात गेले असता अचानक पाऊस सुरू झाला व आडोश्यासाठी ते या गुहेत गेले. पण मुसळधार पावसामुळे या गुहेच्या सर्व वाटा बंद झाल्या आणि मुले व प्रशिक्षक गुहेत अडकले.

ही मुले नऊ दिवस केवळ पाण्यावर राहिली. दरम्यान रेस्क्यू टीमने त्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत तीन टप्प्यात मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आज अखेर 13 पैकी 11 जणांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे, तर आणखी दोघांना बाहेर काढण्याचे काम अद्याप चालू आहे. बचाव कार्यात पाऊस हा मुख्य अडसर ठरत आहे. पण येत्या काही काळातच ही मोहीम पूर्ण करण्याचा विश्‍वास गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टनाकार्न यांनी व्यक्त केला आहे. 

या बचावकार्यातील भारताशी संबंधित महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांची सुटका करण्यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला मदतीची विनंती केली. भारतातील किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लड पंप्स पाठविले. भारत सरकार व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली.

थायलंडला पोहोचताच या टीमने कामास सुरूवात केली व फ्लडपंप्स कार्यान्वित केले. पाणी उपसा झाल्याचा सुखद परिणाम असा झाला की, रविवारी (ता. 8) चार मुलांची, सोमवारी (ता. 9) मुलांची व आज उर्वरित पाच जणांची सुटका करण्यात यश मिळत आहे. आज (ता. 10) 13 पैकी 11 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर उर्वरित दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर चालू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kirloskar company rushed to help authorities to rescue footballers trapped in caves