अबब! 2 महायुद्धे, UK चे 7 राजे, US चे 39 राष्ट्राध्यक्ष पाहिलेले 188 वर्षांचे कासव

tortoise jonathan
tortoise jonathan

जो पृथ्वीवर आलाय तो कधी ना कधी मरणारच! हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र, तरीही लोक मरणाला कायम घाबरत असतात. आपल्याला लवकर मरणच येऊ नये यासाठी प्रार्थना करत असतात. दिर्घायुष्याची इच्छा ही कुणालाही चुकली नाहीये. काही अपवाद वगळले तर प्रत्येकालाच भरपूर आयुष्य जगायची आस असते. माणसांचं माहित नाही पण इतर काही सजिवांना भरपूर आयुष्य जगण्याचं वरदान स्वत: निसर्गानेच दिलेलं आहे. माणूस जास्तीतजास्त 120 वर्षे जगू शकतो. पण असे अनेक सजीव आहेत, जे याहून अधिक काळ सहजतेने जगतात. 

यातीलच एक सजीव म्हणजे कासव. कासव सर्वाधिक काळ जगतं. मात्र, त्यातही सर्वांत जास्त काळ जगलेल्या कासवाविषयी तुम्हाला माहितीय का? याविषयीच आपण आज माहिती घेणार आहोत. जोनाथन नावाच्या या कासवाचे वय आहे 188 वर्षे! इतकं वर्षे आयुष्य लाभण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे ते कासव प्राण्याच संयम. कासव अत्यंत संथ गतीने श्वासोच्छवासाची प्रक्रिया करते. त्यामुळे त्याचे आयुर्मान वाढलेले दिसून येते.

या कासवाचा फोटो ट्विट केलाय तो आयएफएस ऑफिसर परवीन कासवान यांनी. त्यांनी म्हटलंय की या कासवाचा जन्म 1832 मध्ये झाला आहे. या कासवाने आतापर्यंत दोन्ही महायुद्ध पाहिली आहेत. रशियाची क्रांती पाहिलीय. ब्रिटीश गादीवरचे सात राजे पाहिलेत. अमेरिकेचे 39 राष्ट्राध्यक्ष पाहिले आहेत आणि आता कोरोनाची महामारी देखील आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलीय. यावरुनच माहिती पडतं की हा वाईट काळ देखील जाईल. हे कासव साऊथ अटलांटिक महासागरातील ब्रिटेनच्या सेंट हेलेना बेटावर राहतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com