esakal | श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया नेमके आहेत तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया नेमके आहेत तरी कोण?

- श्रीलंकचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे हे श्रीलंकेतील युद्धकाळातील वादग्रस्त माजी संरक्षण सचिव आहेत.

श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया नेमके आहेत तरी कोण?

sakal_logo
By
पीटीआय

कोलंबो : श्रीलंकचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे हे श्रीलंकेतील युद्धकाळातील वादग्रस्त माजी संरक्षण सचिव आहेत. त्यांचे बंधू महिंदा राजपक्षे यांच्या 2005 ते 2014 या अध्यक्षपदाच्या काळात ते या पदावर होते. त्यांनी लष्करी सेवेत काही काळ घालविला आहे. श्रीलंकेत 30 वर्षे सुरू असलेली अंतर्गत यादवी निष्ठुरपणे संपविण्याचे काम गोताबाया यांनी केले होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

श्रीलंकेतील बहुसंख्याक सिंहली समुदायासाठी ते "युद्धवीर' आहेत, तर अल्पसंख्याक तमिळ नागरिकांमध्ये ते फारसे प्रिय नाहीत. गोताबाया यांनी यादवीच्या काळात अनेक तमिळ कुटुंबांना संपविले, असा आरोप आहे. गोताबाया अध्यक्ष झाल्याने देशातील वांशिक संघर्ष वाढणार असल्याची भीती येथील मुस्लिमांनाही वाटत आहे. यादवीच्या काळात त्यांच्या मानवाधिकार भंगाचाही आरोप झाला होता. हे आरोप त्यांनी कधीही मान्य केले नाहीत. 

भारतावरील परिणाम 

श्रीलंकेतील घडामोडींवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. श्रीलंकेवर चीनचे मोठे कर्ज असून या कर्जापोटीच चीनने श्रीलंकेतील एक बंदर 2017 मध्ये ताब्यात घेतले आहे. हिंदी महासागरात चीन हातपाय पसरत असतानाच त्यांच्या बाजूने झुकणारा अध्यक्ष श्रीलंकेत निवडून आल्याने भारताला सावध राहावे लागणार आहे.

चीनने काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेला एक युद्धनौकाही भेट दिली होती. अर्थात, श्रीलंकेबरोबरील भारताचा व्यापार आणि राजनैतिक संबंध चांगले असल्याने भारताला नुकसान होण्याची शक्‍यता नाही.