संयुक्त राष्ट्रांच्या माजी महासचिवांचे निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला होता. 1997 मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली होती. पुढे ते 1962 ते 1974 आणि 1974 ते 2006 इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात ते काम करत होते. 

संयुक्त राष्ट्रसंघ- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला होता. 1997 मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली होती. पुढे ते 1962 ते 1974 आणि 1974 ते 2006 इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात ते काम करत होते. 

त्याचबरोबर, 1962 मध्ये कोफी अन्नान यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेत 3 वर्षे बजेट अधिकारी म्हणून काम केले होते. 1965 ते 1972 या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले. 

कोफी अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता कशी प्रस्थापित होईल यावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यासाठी आपले पूर्ण आयुष्य खर्च केले आहे. त्यासाठी, त्यांना 2001 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते. तसेच गरीबीचे उच्चाटन कसे करता येईल यादृष्टीनेही त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kofi Annan former UN secretary general dies