कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा असल्याचा दावा; हिरा परत द्यावा अशी मागणी

दक्षिण आफ्रिकेतून ब्रिटिश राजघरण्यात गेलेल्या एक खास हिऱ्याची मागणी
कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा असल्याचा दावा; हिरा परत द्यावा अशी मागणी

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉलला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर काल 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजघराण्याच्या ताब्यात असणाऱ्या खजिन्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ज्या देशांकडून खंडांकडून हा खजिना नेण्यात आला तो आता परत मिळवा अशी मागणी होऊ लागली आहे.

तर कोहिनूर हिरा परत दिला जावा अशी मागणी भारताकडून केली जात आहे. कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा असल्याचा दावा ओडिशा राज्यातील एका संघटनेचा आहे. हा कोहिनूर हिरा ब्रिटनमधून परत आणून ऐतिहासीक मंदिरात परत आणण्यासाठी संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून ब्रिटिश राजघरण्यात गेलेल्या एक खास हिऱ्याची मागणी करण्यात आली आहे. या हिऱ्याच नाव ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका असं आहे. हा हिरा ब्रिटिशांनी आम्हाला परत द्यावा अशी मागणीही आफ्रिकेतून जोर धरू लागली आहे. चेज ऑर या वेबसाइटवर हिरा परत देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर 6 हजारपेक्षा जास्त नागरिकांची स्वाक्षरी आहे.

ज्या ज्या देशात ब्रिटिशांनी राज्य केलं त्या त्या देशातून त्यांनी मौल्यवान दागिने खजिने लुटले, घेऊन गेले त्या त्या देशांकडून त्याचा खजिना परत घेण्यासाठी मागण्या होऊ लागल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर मागणी जोर धरू लागली आहे. भारतातून घेऊन गेलेल्या कोहिनूर हिरा परत घेण्यासाठीची मागणी जोर धरू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com