अपुरी झोप करते तुमच्या कामजीवनावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

हा निष्कर्ष फ्लोरीडाच्या एका लैंगिक आरोग्यतज्ञांनी काढला आहे. 

फ्लोरीडा : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पुरेशी झोप न मिळणे ही सर्वांचीच समस्या झाली आहे. अपु-या झोपेमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, वजन वाढणे, निराशा वाढणे असे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. मात्र या सर्वांसोबतच अपुरी झोप लैंगिक जीवनावर देखील परिणाम करू शकते, असा निष्कर्ष फ्लोरीडाच्या एका
लैंगिक आरोग्यतज्ञांनी काढला आहे. 

शरीराला पुरेशी झोप न मिळाल्याने थकवा जाणवतो, ज्यामुळे तुम्ही लैंगिक जीवनाचा आनंद लुटू शकणार नाही. अशी माहिती डॅाक्टरांनी दिली आहे. यासाठी सर्वेक्षण करण्याकरीता 4000 स्त्री व पुरूषांची माहिती गोळा करण्यात आली.

ज्यातून समोर आले की, एक विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स जे लैंगिक जीवन आनंददायी करण्याकरीता गरजेचे असतात. ते हार्मोन्स पुरेशी झोप मिळाल्यानंतरच शरीरात तयार होतात. त्यामुळे अपुरी झोप ही लैंगिक जीवनात समस्या निर्माण करू शकतात. असा निष्कर्ष या सर्वेक्षणात समोर आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack of sleep can affect your libido.