लडाख सीमारेषेवर तणाव: पाक चीनच्या तर अमेरिका भारताच्या बाजूनं

Ladakh Border  tension, India, China, Pakistan, America
Ladakh Border tension, India, China, Pakistan, America

नवी दिल्ली : India China Tensions Updates: लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यातील वाद टोकाला पोहचला आहे. वादग्रस्त मुद्यावर शांततेच्या मार्गाने चर्चेतून तोडगा काढण्याचे प्रयत्न दोन्ही देशांकडून सुरु असताना सोमवारी सीमारेषेवर हिंसक घटना घडल्याचे समोर आले. प्रत्यक्ष ताबारेषेवर (एलएसी)  दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाली. यात भारताचे कमांडिंग अधिकारी (कर्नल) समेत 20 जवान शहीद झाले. एएनआयच्या वृत्तानुसार, प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत भारतीय लष्कराने चीनच्या 43 सैन्यांना ठार केले आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये आपापल्या जागेवरुन मागे हटत असताना धुमचक्री झाली. रात्री उशीराने झालेल्या या घटनेत दोन्ही बाजूच्या सैन्यांना जीव गमवावा लागला. लडाखटच्या सीमारेषेवरील युद्धजन्य परिस्थितीवर अन्य राष्ट्र लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर  पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वादग्रस्त क्षेत्रात भारताने रस्ता बांधणीची भूमिका घेतल्याने हा वाद आणखी पेटला आहे, असे म्हणत पाकने चीनची बाजू घेतली आहे.  
दुसरीकडे जगातील महासत्ता असलेला आणि कोरोनाच्या मुद्यावरुन चीनवर हल्लाबोल करणाऱ्या अमेरिकेने भारताच्या बाजूने असल्याचे संकेत दिले आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत-चीन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर लडाख परिसरात चीनी सैन्याच्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय लष्करी जवानांना श्रद्धांजली वाहत अमेरिकेने त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात सामील असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेची ही भूमिका भारताच्या सोबत असल्याचे संकेत देणारी आहे. यापूर्वीही अमेरिकेने भारताची बाजू घेतली होती. लडाखच्या मुद्यावर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची काहीच गरज नाही. दोन्ही देश आपआपल्या स्तरावर यावर तोडगा काढण्यात सक्षम आहेत, असे चीनने म्हटले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com