esakal | अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची खासियत तुम्हाला माहितीये का?
sakal

बोलून बातमी शोधा

America, Election, US Election, Donald Trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा निवडून येण्याची संधी असली तरी जो बायडेन यांच्या रुपाने त्यांना तगडे आव्हान मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड नेमकी होते कशी हे आपण पाहुया...

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची खासियत तुम्हाला माहितीये का?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वॉशिंग्टन- नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन  समोरासमोर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा निवडून येण्याची संधी असली तरी जो बायडेन यांच्या रुपाने त्यांना तगडे आव्हान मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड नेमकी होते कशी हे आपण पाहुया...

राष्ट्रपतीपदासाठी कोण उभं राहू शकतं?

अमेरिकेच्या संविधानानुसार राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे 35 वर्षे वय पूर्ण केलेले असावे. तसेच तो जन्माने अमेरिकेचा नागरिक असावा आणि त्याने अमेरिकेमध्ये किमान 14 वर्ष वास्तव केलेलं असावं. 

अमेरिकेने आतापर्यंत कधीही ख्रिश्चनेतर व्यक्ती किंवा महिला राष्ट्राध्यक्ष अनुभवला नाही. तसेच बराक ओबामा हे अमेरिकेला लाभलेले एकमेव कृष्णवर्णीय अमेरिकन आहेत. 

अमेरिकेतील मुख्य राजकीय पक्ष कोणते?

अमेरिकेत फक्त दोनच मोठे पक्ष आहेत. डेमोक्रॅट्स जो उदारमतवादी पक्ष म्हणून ओळखला जातो आणि रिपब्लिकन्स जो उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. लिबर्टेरियन पक्षाचा उमेदवारही कधी कधी मैदानात असतो. शिवाय ग्रीन पक्ष आणि इंडिपेंडट पक्षही आपला उमेदवार क्वचितच उभा करतो.

'ते' शब्द मनाला वेदनादायक वाटायचे; ब्रिटन अर्थमंत्र्यांची दाहक प्रतिक्रिया

फेब्रुवारी महिन्यापासून अमेरिकेत प्राथमिक निवडणुकांना सुरुवात होते. यातून पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला 1991 प्रतिनिधींची पसंती मिळाल्यास त्याचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित होते.  डेमोक्रॅटिक पक्षाकडून यावेळी  जो बायडेन आणि बर्नी सॅन्डर्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली, पण सॅन्डर्स यांनी माघार घेतल्याने  बायडेन यांचे नाव निश्चित झाले आहे. तर 2017 मध्येच रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून ते पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.

राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होते?

पक्षाने निवडलेले उमेदवार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी उभे राहतात. यावेळी ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं( पॉप्युलर व्होट)  मिळतील तो विजयी होत नाही. तर ज्याला एकूण 538 मतांपैकी 270 किंवा अधिक मतं मिळतील( इलेक्टोरल व्होट) तो उमेदवार विजयी होतो. प्रत्येक राज्याचे काही निश्चित इलेक्टोर्स असतात. उदा. कॅलिफोर्निया(55), टेक्सास(38), न्यूयॉर्क(29), फ्लोरिडा(29), पेन्सलवेनिया(20) आणि इल्यनॉय(20) इत्यादी. त्यामुळे राज्याकडे असणाऱ्या इलेक्टोर्सवरुन त्यांचे महत्व वाढत जातं. साधारणपणे ज्या दिवशी मतदान पार पडते त्याच दिवशी रात्रीपर्यंत कोणता उमेदवार विजयी झाला हे निश्चित होतं.

कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या 29 औषधांची ओळख; भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश

प्रत्येक राज्य तिथली मतमोजणी करतं आणि साधारणपणे मतदान घेण्यात आल्याच्या दिवशीच रात्रीपर्यंत विजेता ठरतो. नोव्हेंबरमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष आपला पदभार स्वीकारतो. राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ चार वर्षाचा असतो, तसेच तो सलग दोन वेळा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतो.

loading image
go to top