एच-4 व्हिसा रद्दची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

अमेरिकेतील हजारो भारतीयांना बसणार फटका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतलेला एच-4 व्हिसा रद्द करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो लागू केला जाईल. याबाबतची माहिती ट्रम्प प्रशासनानेच अमेरिकेच्या एका न्यायालयात दिली. त्यामुळे हजारो भारतीयांना मोठा फटका बसणार आहे.

अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात घेतलेल्या निर्णयानुसार, एच-1बी व्हिसाधारकांच्या पती/पत्नीला नोकरी करण्याचा परवाना मिळत होता. मात्र, ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पतीजवळ एच-1बी व्हिसा असेल तर पत्नीला नोकरी करण्याची परवानगी नसेल. त्याच धर्तीवर पत्नीकडे व्हिसा असेल, तर पतीला नोकरीची परवानगी नसेल. या निर्णयामुळे हजारो भारतीयांना फटका बसेल असे मानले जात आहे. अमेरिकेतील एकूण 70 हजार लोकांकडे एच-4 व्हिसा आहे आणि यामध्ये भारतीयांची संख्या 93 टक्के आहे.

प्रस्तावित नियम एक मंत्रालयाकडे परवानगीसाठी गेला आहे. तेथून परवानगी मिळाल्यानंतर काही प्रक्रिया पार पाडल्यानंतर तो लागू केला जाऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The last phase of the cancellation process of the H-4 visa