जगाच्या शेवटच्या टोकाला जाणारा रस्ता; पुढे जाण्यास नाही मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगाच्या शेवटच्या टोकाला जाणारा रस्ता; पुढे जाण्यास नाही मार्ग

जगाच्या शेवटच्या टोकाला जाणारा रस्ता; पुढे जाण्यास नाही मार्ग

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जग इतकं मोठं आहे पण या जगाचा (World’s Last Point) शेवट कुठे होतो कुठेतरी होतच असेलचं, जिथे पुढे जाण्यासाठी कोणताच रस्ता नसेल (Where the World Ends). तुम्हाला जर जगाचा शेवट शोधायाच असेल तर उत्तर ध्रुवाच्या (North Pole is the last point of world) दिशेने जावे लागेल, जिथे जग संपते. चला जाणून घेऊ या, जगातील शेवटचा रस्ता E-69 बाबत रंजक गोष्टी (last road on earth is e69 in north pole where world end)

हे तर सर्वांना माहिती आहे की जगातील उत्तर ध्रुव (Mysterious North Pole) रहस्यमय ठिकाण आहे. या ठिकाणी पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते. या ठिकाण नॉर्वे देशात येते. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की, नॉर्वेमधील हा शेवटचा रस्ता आहे जिथे जगाचा अंत होतो. त्यापुढे जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. या रस्त्यावर पुढे जाण्यास परवानगी नाही. हा रस्त्यावर पुढील भाग संपूर्ण बर्फाने आच्छादलेला आहे आणि त्यापुढे समुद्र आहे.

हेही वाचा: पहिल्यांदाच बिकीनी व्हॅक्स करताय? मग ही बातमी वाचा

या रस्त्यावर एकट्याने जाण्यास मनाई

जगातील शेवटचा रस्ता असल्यामुळे लोकांना याठिकाणी जाण्याची इच्छा होणे सहाजिक आहे. जगातील शेवटच टोक कसे आहे हे जाणून घेण्याची लोकांची इच्छा असते. पण,E-69 या रस्त्यावर एकट्याने जाण्यास किंवा ड्राईव्हिंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तुम्हाला हा रस्त्याला भेट द्यायची असेल तर तुम्हाला गृपमध्ये जावे लागते. कारण सर्वत्र बर्फच बर्फ असल्यामुळे येथे जाणारे लोक रस्ता चूकतात. येथे थंडावा जास्त असल्यामुळे जर रस्ता चूकला तर परत माघारी येणे अवघड आहे. त्यामुळेच 14 किमी लांब रस्त्यावर कोणीही एकटे जात नाही.

हेही वाचा: तेलकट त्वचेला वैतागलाय? ऑल-राऊंडर 'सीरम' वापरून पाहा!

येथील जग वेगळे आहे.

1930 सालापर्यंत येथे कोणीही बाहेर जाऊन काहीही करु शकत आहे. येथील उपजिवीका मस्यपालनावर आधारित आहे. 1934 सालानंतर लोकांनी येथे ये-जा करण्यासाठी सुरुवात केली आणि पर्यटनाची शक्यता खूप वाढली आहे. येथे आल्यावर लोकांना वेगळ्या जगाचा अनुभव असल्यासारखे वाटते. येथील सुर्यास्ताचा अनुभव फार वेगळा आहे. पण उत्तर ध्रुवावर उन्हाळ्यामध्ये सुरज मावळत नाही आणि हिवाळ्यामध्ये सहा महिने दिसतच नाही. म्हणजे जवळपास 6 महिने लोक रात्रीच्या अंधकारामध्ये राहतात.

loading image
go to top