esakal | पाकिस्तान: पेशावरमधील मदरशात बॉम्बस्फोट; 7 जणांचा मृत्यू, 70 जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan blast main.jpg

पाकिस्तानमधील पेशावर येथील दिर कॉलनीतील एका मदरशाजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला आहे.

पाकिस्तान: पेशावरमधील मदरशात बॉम्बस्फोट; 7 जणांचा मृत्यू, 70 जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पेशावर- पाकिस्तामधील पेशावर येथे एका मदरशात झालेल्या भीषण स्फोटात किमान 7 जणांचा मृत्यू तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट पेशावरमधील दिर कॉलनीतील मदरशात झाला आहे. एसएसपी मन्सूर अमन यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्फोटाचे कारण शोधले जात असून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

'डॉन न्यूज'ने लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ता मोहम्मद असीम यांच्या हवाल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. यामध्य लहान मुलांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी अधिकारी दाखल झाले आहेत. मागील महिन्यात खैबर पख्तूख्वा परिसरातही स्फोट झाला होता. 

हेही वाचा- चंद्राच्या प्रकाशित भागात पाणी

दरम्यान, मागील आठवड्यातही पाकिस्तानमध्ये स्फोट झाला होता. कराचीमध्ये हा स्फोट जाला होता. गुलशन-ए-इक्बालमध्ये कराची विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एका 4 मजली इमारतीत स्फोट झाला होता. यात 5 जण ठार तर 20 हून अधिक लोक जखमी झाले होते. परंतु, हा बॉम्बस्फोट होता की इतर दुसरा स्फोट होता याची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही.  

loading image