चंद्राच्या प्रकाशित भागात पाणी

वृत्तसंस्था
Tuesday, 27 October 2020

पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या, चंद्राच्या कायम सावली असलेल्या भागात पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र, आता प्रथमच सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

वॉशिंग्टन - सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने आज प्रथमच जाहीर केले. या शोधामुळे चंद्राबाबतच्या नव्या शोधांना बळ मिळाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या, चंद्राच्या कायम सावली असलेल्या भागात पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र, आता प्रथमच सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सूर्याच्या थेट प्रकाशात चंद्रावर पाणी टिकून राहणे अशक्य असल्याचे शास्त्रज्ञांचे  यापूर्वी मत होते. ‘नासा’ने आज ‘स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी’ (सोफिया) या वेधशाळेतून चंद्रावरील प्रकाशित भागात पाणी असल्याची घोषणा केली. ‘सोफिया’ ही जगातील सर्वांत मोठी विमानातील वेधशाळा आहे. बोइंग ७४७ या विमानात बदल करून ही उंच अवकाशात उडणारी वेधशाळा तयार करण्यात आली आहे. या ‘सोफिया’द्वारे केलेल्या निरीक्षणांवरून चंद्रावरील पाण्याबाबत निष्कर्ष काढण्यात आला आहे. यानुसार, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील क्लेव्हीयस दरीत पाणी असल्याचे आढळले आहे. मात्र, हा फक्त प्राथमिक पुरावा असून याबाबत अधिक अभ्यास करणे उचित ठरेल, असेही ‘नासा’ने स्पष्ट केले आहे. तसेच, पाणी असल्याचे पुरावे मिळाल्याने चंद्रावर जीवसृष्टी असेल, असे मानण्याचे कारण नाही, असेही ‘नासा’ने स्पष्ट केले आहे.

अमेरिकन हॉटेलनं हाकललं; अनन्या बिर्लांनी शेअर केला वर्णद्वेषाचा अनुभव

‘नासा’चे निष्कर्ष
पाणी प्रवाही नसून रेणूंच्या स्वरूपात आणि गोठलेल्या अवस्थेत आहे
सौर वादळे किंवा लघुग्रहांद्वारे चंद्रावर पाणी आले असण्याची शक्यता
हे पाणी वापरण्यायोग्य नसेल, पाणी मिळवता येईल का, याबाबत शंका
प्रत्येक चौरस मीटरमध्ये ३५० मिलिलिटर पाणी असल्याचा अंदाज
चंद्रावर १५ हजार चौरस मैलांवर पाणी असण्याची शक्यता

तैवानमुळे वाढली चीनची पोटदुखी

यासाठी वापर शक्य
संशोधन
चांद्र मोहिमांमध्ये इंधन म्हणून
अंतराळवीरांना पिण्यासाठी आणि ऑक्सिजनचा स्रोत म्हणून

Edited By- Kalyan Bhalerao


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NASA today announced for the first time that there is water on the surface of the moon where the sun shines