VIDEO - शक्तीशाली स्फोटांनी बैरूत हादरलं; भीषण दृश्ये आली समोर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

बैरुतमध्ये झालेल्या दोन स्फोटांमध्ये 15 मिनिटांचं अतंर होतं. स्फोटांचा आवाज आणि हादरा इतका भयंकर होता की घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या आहेत.

बैरूत - लेबनॉनची राजधानी बैरूत भीषण स्फोटांमुळे हादरलं आहे. या स्फोटांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटाची भीषण दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र स्फोटाची तिव्रता इतकी जबरदस्त होती की बैरूतला मोठा हादरा बसला आहे. शहरामध्ये दोन स्फोट झाले असल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 

बैरुतमध्ये झालेल्या दोन स्फोटांमध्ये 15 मिनिटांचं अतंर होतं. स्फोटांचा आवाज आणि हादरा इतका भयंकर होता की घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. स्फोटावेळी झालेल्या आवाजामुळे शहर हादरलं असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

लेबनॉनमधील माध्यमांनी स्फोटानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात लोक पडलेले दिसत आहेत. स्फोटाचे कारण मात्र स्पष्ट झालं नाही. बेरुतमधील पोर्ट भागात हा स्फोट झाला असून शहराला याचे धक्के बसले आहेत. काही भागांमधील वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lebanons capital beirut high explosion video viral