

British swimmer Lewis Pugh completes a 15-kilometre swim across the Strait of Hormuz in three days amid the Iran war, witnessing explosions, burning vessels and threats to marine life
esakal
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असतानाच ब्रिटिश जलतरणपटू लुईस प्यू यांनी अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पोहत प्रवास पूर्ण केला आहे. वयाच्या ५६व्या वर्षी त्यांनी मुसांदम द्वीपकल्पापासून होर्मुझच्या भूशिरापर्यंत सुमारे १५ किलोमीटरचे अंतर पार केले. युद्ध सुरू झाल्यानंतर या संवेदनशील सागरी क्षेत्रात एवढे लांब अंतर पोहून पार करणारे ते पहिलेच जलतरणपटू असल्याचे मानले जात आहे. या तीन दिवसांच्या प्रवासात त्यांनी एकूण साडेसहा तास पोहण्याचा सराव केला. विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान त्यांनी केवळ स्विमिंग ट्रंक्स, गॉगल्स आणि संयुक्त राष्ट्रांचे चिन्ह असलेली टोपी परिधान केली होती.