इंडोनेशियात विमान कोसळले; 188 प्रवाश्यांच्या मृत्यूची भिती

वृत्तसंस्था
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लायन एअरवेजच्या या विमानातून 188 प्रवासी प्रवास करत होते. बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. विमानाचे अवशेष समुद्रात सापडले आहेत. 

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण घेतलेले लायन एअऱवेजचे विमान आज (सोमवार) सकाळी समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत 188 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

लायन एअरवेजच्या बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाने आज सकाळी साडेसहा वाजता जकार्ताहून पेन्गकल पिनांग येथे उड्डाण घेतले. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर 13 व्या मिनिटालाच विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळाने सुमात्रा बेटांजवळ समुद्रात ते कोसळल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लायन एअरवेजच्या या विमानातून 188 प्रवासी प्रवास करत होते. बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. विमानाचे अवशेष समुद्रात सापडले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lion Air flight carrying 188 passengers crashes off near Sumatra