सत्ताविजयासाठी जोरदार प्रयत्न करावेत; ब्रिटनमधील कार्यकर्त्यांना सोनियांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lok Sabha elections Strive hard for victory Sonia gandhi  appeal to activists in Britain rahul gandhi congress

सत्ताविजयासाठी जोरदार प्रयत्न करावेत; ब्रिटनमधील कार्यकर्त्यांना सोनियांचे आवाहन

लंडन : संसदेत सध्या विरोधी बाकांवर असलेल्या पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेत आणण्यासाठी इतर देशांमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत, असे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केले. या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत असताना राहुल यांनी अचानक सोनिया यांच्याशी संपर्क साधत कार्यकर्ते आणि पक्षाध्यक्ष यांच्यात संवाद घडवून आणला. राहुल गांधी हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ब्रिटनमधील इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या (आयओसी) कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

यावेळी राहुल यांनी पक्षाची धोरणे, भूमिका आणि पक्षासमोरील आव्हाने कार्यकर्त्यांना समजावून सांगितली. ही चर्चा सुरु असतानाच राहुल यांनी अचानक त्यांच्या मातु:श्री आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचा कार्यकर्त्यांबरोबर संवाद घडविला. सोनिया यांनीही कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी कठोर मेहनत घेण्याचे आवाहन केले. राहुल गांधी यांनी पक्षाची सूत्रे स्वत:कडे घ्यावीत, जेणेकरून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सत्तेवर येऊ शकेल, अशी विनंती ‘आयओसी’चे अध्यक्ष कमल धालिवाल यांनी राहुल यांना केली.

राहुल म्हणाले...

काँग्रेसने भारतात वैचारिक लढाई सुरु केली आहे

कोणत्याही पक्षाला विरोध नाही, विचारसरणीला मात्र विरोध

देशातील घटनात्मक संस्थांचे संरक्षण करावे लागेल

Web Title: Lok Sabha Elections Strive Hard For Victory Sonia Gandhi Appeal To Activists In Britain Rahul Gandhi Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top