
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येतेय. अद्याप यावर भारत किंवा ब्रिटन सरकारकडून काहीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लंडनमधील एका कार्यक्रमातून परतत असताना ही घटना घडली. जयशंकर यांच्यासह अनेक भारतीय अधिकाऱ्यांना याआधी खलिस्तानींकडून धमक्या दिल्या गेल्या आहेत.