
मद्यपान करुन गाडी चालवताना अपघातात 2 मुलांचा मृत्यू; आईला ४ वर्षे कारावास
लंडन : लंडनमध्ये मद्यपान करुन गाडी चालवताना झालेल्या अपघातात एका महिलेच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर सदर आईला कोर्टाने चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून त्यावेळी कोर्टात तीने हंबरडा फोडला आहे. हा अपघात ९ ऑगस्ट २०२१ रोजी लंडनमध्ये घडला होता.
मेरी मॅककॅन असं या महिलेचं नाव असून ती 9 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11.10 वाजता मद्यपान करुन गाडी चालवत होती त्यावेळी गाडीच्या मागच्या बाजूला तीने तीच्या दोन लहान मुलांना बसवले होते. पार्टीहून परत येत असताना तीच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यामध्ये तीच्या दोन मुलांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान या अपघातात मेरी मॅककॅन आणि गाडीचा ड्रायव्हर जखमी न झाल्याचा दावा तीच्या कुटुंबियांनी केला होता. मॅककॅनने यापूर्वी दारू पिऊन निष्काळजीपणे वाहन चालवल्याने मृत्यू झाल्याच्या दोन घटना मान्य केल्या होत्या.
हेही वाचा: लतादीदींच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी चक्क उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नव्हतं
यावर निर्णय देताना आयलेसबरी क्राउन कोर्टातील न्यायाधीश फ्रान्सिस शेरीडन यांनी सदर ३५ वर्षीय तरुणीने मद्यपान करुन गाडी चालवण्याची चूक केली असल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले की, एक आई म्हणून तुम्ही निष्काळजीपणाने मद्यपान करुन गाडी चालवता हे लज्जास्पद आहे. रात्री झालेल्या अपघातात तीच्या लहान मुलांना जीव गमवाव लागला होता. तीने आपल्या लहान मुलांना सीटबेल्ट न लावल्याने दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याचं कोर्टात सांगण्यात आलं.
त्यानंतर कोर्टातील सुनावणीत तीला दोषी ठरवत चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मद्यपान करुन वाहने न चालवण्याचं आवाहनही कोर्टाने केलं आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर सदर महिलेने हंबरडा फोडला.
Web Title: London Mother Killed Two Kids 4 Year Jail
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..