मालवणचे वराडकर आयर्लंडचे पंतप्रधान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

लंडन - मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आज आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. आयर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते मिळवत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.

लंडन - मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आज आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. आयर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते मिळवत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.

आयर्लंडमध्ये 2007 मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली होती. "पंतप्रधान झाल्यास देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा; तसेच राजकीय स्थैर्य देण्याचा माझा प्रयत्न असेल', अशी भूमिका वराडकर यांनी मांडली होती. भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांना आयर्लंडमधील पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहून त्यांच्या भारतातील कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. कोकणातही अनेक ठिकाणी फटाके वाजवून हा आनंद साजरा करण्यात आला.

वराडकर यांचा जन्म 18 जानेवारी 1979 ला झाला. डब्लिन वेस्ट मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करतात. फाईन गोल पक्षाकडून ते कार्यरत असून त्यांना सोफी व सोनिया या दोन मुली आहेत. 38 वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्‍टर आहेत. सुरवातीला उपमहापौर, त्यानंतर आयर्लंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवत तेथे वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रिपद; तसेच आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा मंत्रिपदावर त्यांनी प्रभावी काम केले.

यामुळेच थेट पंतप्रधानपदाचे मुख्य दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सिमोन कोव्हिने यांच्याशी होता.

लिओ यांचे कुटुंब मूळचे वराड (ता. मालवण) या छोट्याशा गावातील. त्यांचे वडील पेशाने डॉक्‍टर आहेत. ते मुंबईतून 1960 मध्ये आयर्लंडमध्ये स्थायिक झाले. त्यांनी तेथेच नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मूळ आयरिश असलेल्या मिरीअम यांच्याशी विवाह केला.

समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते
लिओ समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते मानले जातात. आपल्या 36 व्या वाढदिवशी 2015 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली होती. समलिंगी विवाह, गर्भपात कायद्यात काही प्रमाणात शिथिलता अशा धोरणांचा त्यांनी पुरस्कार केला. यासाठी त्यांनी मोहीमही राबविली. आयर्लंड हा सामाजिकदृष्ट्या रूढीवादी देश मानला जातो. अशा ठिकाणी असे विचार घेऊन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांनी मारलेली मुसंडी आश्‍चर्यकारक मानली जात आहे.

Web Title: london news leo ashok varadkar irland prime minister