California Fire : लॉस एंजेलिसच्या वणव्याची दाहकता कायम; आगीतील मृतांची संख्या पोहचली २४वर , तब्बल ४० हजार एकर क्षेत्र भस्मसात
Wild fire : लॉस एंजेलिसच्या जवळ जंगलात लागलेल्या वणव्यामुळे मृतांची संख्या २४ झाली आहे. ४० हजार एकर क्षेत्र भस्मसात होऊन अनेक नागरिक बेपत्ता झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कॅलिफोर्निया : लॉस एंजेलिसनजीकच्या जंगलात लागलेल्या वणव्याची दाहकता अद्याप कमी झालेली नाही. यातील मृतांची संख्या सोमवारी २४ झाली असून मोठ्या प्रमाणावर नागरिक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.