Lottery Ticket : बिस्कीट खरेदी करणं ठरलं निमित्त; घरी येताच महिला झाली करोडपती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lottery

Lottery Ticket : बिस्कीट खरेदी करणं ठरलं निमित्त; घरी येताच महिला झाली करोडपती

Lottery Ticket : जगातील प्रत्येक व्यक्तीला रातोरात श्रीमंत व्हायचे आहे. यासाठी प्रत्येक जण कठोर मेहनत करत आहे.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

हेही वाचा: Eknath Shinde : निवडणूक कोणतीही असो नियोजन करून आपणच जिंकणार; शिंदेंच्या विधानानं चर्चेला उधाण

आपल्यापैकी अनेकांनी पिक्चरमध्ये एखाद्य व्यक्तीचं नशीब रातोरात बदलेलं बघितले असेल, मात्र, वास्तविक आयुष्यात असे घडत नाही.

पण, वास्तविक आयुष्यातही एका महिलेचं नशीब अवघ्या काही मिनिटांमध्ये बदललं. यासाठी केवळ बिस्किट खरेदी करणं निमित्त ठरलं. नशीब बदलणारी ही घटना अमेरिकेतील एका महिलेसोबत घडली आहे.

हेही वाचा: Documentary Row : केंद्राची मोठी कारवाई; PM मोदींवरील डॉक्युमेंटरीचे ट्वीट ब्लॉक करण्याचे आदेश

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 51 वर्षीय अमेलिया एस्टेस ही महिला यूएसमधील नॉर्थ कॅरोलिना येथे वास्तव्यास आहे.

गेल्या शनिवारी ती बिस्किट खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली होती.

यावेळी एस्टेसने १६०० रुपयांचे एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले. खरेदी करून झाल्यानंतर एस्टेनने लॉटरीचे खरेदी केलेले तिकीट स्क्रॅच केले.

त्यावरील नंबर मॅच केले असता ते मॅच झाले. नंबर मॅच झाल्याने एस्टेनला १६ कोटींची लॉटरी लागली.

हेही वाचा: OMG : न सांगता पत्नीने थेट गाठलं माहेर; नाराज पतीने स्वतःचं गुप्तांग...

लॉटरी लागल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वात पहिले तर विश्वासच बसला नाही. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती.

लॉटरीच्या माध्यमातून मिळालेली ही रक्कम निवृत्तीसाठी वाचवणार असल्याचे तिने सांगितले आहे.