esakal | सिडनीसाठी १०८वा दिवस सुदैवीISydney
sakal

बोलून बातमी शोधा


सिडनीसाठी १०८वा दिवस सुदैवी

सिडनीसाठी १०८वा दिवस सुदैवी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिडनी ः कोरोनाच्या जागतिक साथीमुळे प्रदीर्घ लॉकडाउनला सामोरे गेल्यानंतर सिडनीवासीयांसाठी अखेर १०८वा दिवस सुदैवी ठरला. चार महिन्यांच्या कालावधीतील १०७ दिवस लागू राहिलेले निर्बंध उठविण्यात आल्यामुळे सिडनीवासीयांनी एकच जल्लोष केला.

सोमवारी मध्य रात्रीपासूनच दुकाने आणि पब उघडण्यात आली. त्यामुळे तेथे नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. अनेक बाबतीत सिडनीवासीयांनी स्वातंत्र्य नव्याने अनुभवता आले. अनेकांनी प्रियजनांच्या भेटीगाठींचे नियोजन केले. नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यासाठी प्रवास करण्याची संधीही अनेकांना मिळाली.

हेही वाचा: चीनची भारताला धमकी; युद्ध झालं तर हाराल

याआधी विभागातून पाच किलोमीटरच्या पलिकडे सबळ कारणाशिवाय प्रवास करण्यास मनाई होती. आता लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी बहुतेक निर्बंध लागू नाहीत.आता लोकांना एकत्र भोजन करणे, जिममध्ये जाणे, ग्रंथालयास भेट देणे, तरणतलावावर जाणे अशा गोष्टी नेहमीसारख्या करता येईल. सर्वाधिक मोठ्या रांगा केशकर्तनालय आणि नखांच्या सलूनपाशी होत्या.

लसीकरणामुळे निर्णय

सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठे शहर आहे. न्यू साऊथ वेल्स प्रांतात १६ वर्षांवरील मुलांची लसीकरण मोहीम ७० टक्के पूर्ण झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन उठविण्यात आले. ही टक्केवारी ८० पर्यंत वाढल्यानंतर आणखी निर्बंध उठविण्यात येईल. कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस मिळालेल्या नागरिकांची टक्केवारी सध्या ९० इतकी आहे.

डेल्टामुळे भीती

  • सिडनीत जूनच्या अखेरीस डेल्टाचे रुग्ण सापडले

  • डेल्टा रुग्णांची संख्या ५० हजारापेक्षा जास्त

  • आतापर्यंत ४३९ बळी

  • सिडनीनंतर मेलबर्न, कॅनबेरात डेल्टाचा प्रादुर्भाव

  • लॉकडाउनचे पालन व्हावे म्हणून सिडनीत लष्कराची मदत

  • आता परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे कॅनबेरात शुक्रवारी, तर मेलबर्नला ऑक्टोबरच्या अखेरीस लॉकडाउन उठविणार

  • क्वीन्सलँड, पश्चिम ऑस्ट्रेलिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया, टास्मानिया आणि उत्तर प्रांत येथील प्रशासनाने संसर्गग्रस्त प्रांतांच्या सीमा बंद केल्या, त्यामुळे तेथे विषाणूचा संसर्ग नाही

"शंभर दिवसांचा कालावधी खडतर ठरला, मात्र प्रांतातील नागरिकांनी लस घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यामुळे हा विलक्षण दिवस पाहणे शक्य झाले आहे. निर्बंध उठविण्यात आल्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढू शकेल, पण आरोग्य यंत्रणेने त्यादृष्टिने तयारी केली आहे. कोरोना विषाणूचा सामना करीत जगण्यास आपल्याला शिकावे लागेल."

- डॉमिनिक पेरोटेट, न्यू साऊथ वेल्सचे प्रांतपाल

loading image
go to top