इंडोनेशियामधील भूकंपात 82 ठार 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

जकार्ता : इंडोनेशियाच्या लॉमबॉक बेटांना रविवारी रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात 82 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक जखमी आहेत. 

अमेरिकी भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 7 रिश्‍टर स्केल अशी नोंदली गेली असून, याचे केंद्र जमिनीच्या दहा किलोमीटर आत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 82 जण ठार झाले असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. एक आठवड्यापूर्वीच याठिकाणी भूकंपात 17 लोकांचा मृत्यू झाला होता. 

अधिकाऱ्यांनी भूकंपानंतर सुनामीचा इशारा जारी केला असून, लोकांना समुद्रापासून दूर अंतरावरील भागात जाण्यास सांगण्यात आले आहे. तसेच घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Magnitude 7 Earthquake In Indonesia Kills 82