पाकिस्तानमध्ये गणेशोत्सव उत्साहात

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

कराचीः भारतासह जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पाकिस्तानमध्येही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना हिंदू महाराष्ट्रीयन समुदायाने उत्साहात केली आहे.

भारत-पाकिस्तानचे विभाजन होण्याच्या अगोदरपासून मराठी नागरिकांचे वास्तव्य कराची शहरामध्ये आहे. महाराष्ट्रीयन समुदाय या नावाने परिसराची ओळख आहे. शहरामध्ये श्री महाराष्ट्र पंचायत नावाने संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

संघटनेचे सदस्य विशाल रजपूत (वय 30) म्हणाले, 'भारत-पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून कृष्णा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली येथे गणेशोत्सव साजरा केला जात होता. परिसरामध्ये शिव मंदिर उभारण्यात आले असून, हिंदू नागरिक मोठ्या भावनेने दर्शनासाठी येत असतात. गणेश मठ मंदिर व शिव मंदिरामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जात असून, वर्षभरात गणपती, होळी, दिवाळी व जन्माष्ठीसह 25 ते 30 कार्यक्रम साजरे करतो. कराचीमध्ये साधारणपणे 800 सदस्यांचा मराठी समुदाय आहे. उत्सवादरम्यान वेगवेगळे गोड पदार्थ तयार करतो. यामध्ये लाडू व करंजीचा समावेश असतो.'

'कराचीमधील पंजाब कॉलनी, सदर व डोली खाटा भागामध्ये मराठी नागरिकांचे वास्तव्य आहे. कृष्णा नाईक यांचा मुलगा राजेश नाईक हे समुदायासाठी गणपती तयार करतात. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांनी गणेशोत्सवादरम्यान भेट दिली होती. सध्याच्या गणेशोत्सवादरम्यान मुस्लिम कुटुंबे सहभागी होऊन उत्सव साजरा करण्यासाठी मोठी मदत करतात,' असेही रजपूत यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtrian community celebrate Ganeshotsav karachi in Pakistan