जगभरातील दिग्गजांची ट्विटर अकाउंट हॅक; कोण कोण आहे यादीत?

अशोक गव्हाणे
Thursday, 16 July 2020

जगभरातील दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकन नेते जो बिडेने, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांच्याबरोबरच अ‍ॅपलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीच्या मालकीच्या काही ट्विटर अकाऊंटसचा समावेश आहे.

नवी दिल्ली : जगभरातील दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकन नेते जो बिडेने, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांच्याबरोबरच अ‍ॅपलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीच्या मालकीच्या काही ट्विटर अकाऊंटसचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष जॅक डॉर्सी यांनी झालेल्या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून या समस्येवर ट्विटरची टीम काम करत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्पष्ट केले आहे. आज ट्विटरमध्ये आमच्यासाठी खूप कठीण दिवस आहे. झालेल्या घटनेचा आम्ही अभ्यास करत असून यासंदर्भातील सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, असंही डॉर्सी यांनी ट्विटवरुन म्हटलं आहे.

दिग्गजांचे प्रोफाइल ट्विटर अकाऊंट एकत्र क्रिप्टोकरंसीज घोटाळ्यासाठी हॅक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बिल गेट्स यांच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले आहे की, तुम्ही मला एक हजार डॉलर्स पाठवा, मी तुम्हाला दोन हजार डॉलर्स देईल, तर टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आले आहे की, पुढील एक तासात बिटकॉइनमध्ये पाठवलेली रक्कम दुप्पट होऊन तुम्हाला परत केली जाईल. बिटकॉइन पत्त्याच्या लिंकसह ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. मी कोविड साथीच्या आजारामुळे दान करीत आहे. अशा प्रकारची ट्विट अनेक जणांच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major US Twitter accounts hacked in Bitcoin scam