esakal | ट्रम्प यांना मोठा झटका; महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump

आज या मुद्द्यावर तब्बल 10 तास चर्चा करण्यात आली. 230 विरूद्ध 197 मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

ट्रम्प यांना मोठा झटका; महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर आज (बुधवार) प्रतिनिधीगृहातही प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ट्रम्प यांना हा मोठा झटका मानला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज या मुद्द्यावर तब्बल 10 तास चर्चा करण्यात आली. 230 विरूद्ध 197 मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याविरोधातील दुसरा प्रस्तावही सभागृहात मंजूर करण्यात आला. प्रतिनिधीगृहात हा प्रस्ताव मंजूर झाल्याने आता सिनेटमध्ये हा प्रस्ताव नेण्यात येणार आहे. मात्र, सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाचे वर्चस्व असल्याने प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. 

माझ्याविरोधात महाभियोग हा लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा डाव : ट्रम्प 

ट्रम्प यांच्या विरोधात दोन आरोप ठेवत अमेरिकी संसदेच्या महत्त्वाच्या समितीने त्यांच्यावरील महाभियोगाच्या कारवाईला परवानगी दिली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाची प्रस्तावावर आज अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधिगृहात मतदान झाले. प्रतिनिधिगृहात विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाकडे बहुमत आहे. प्रतिनिधिगृहाची मंजुरी मिळाल्यानंतर महाभियोगाच्या प्रक्रियेवर सिनेटमध्ये सुनावणी होईल. अगदी आज तसेच झाले. शंभर सदस्यसंख्या असलेल्या सिनेटमध्ये मात्र सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे प्रतिनिधिगृहाने मंजुरी दिली तरी सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाची कारवाई फेटाळून लावली जाऊ शकते. 

ट्रम्प यांनी वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. तसेच, त्यांनी आपले विरोधक जो बिडेन आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात एका युक्रेनियन गॅस कंपनीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला होता, या आरोपांना अमेरिकी संसदेच्या न्याय समितीने मान्यता दिली होती.