भारताला प्रत्युत्तर देणार नाही - महातीर मोहंमद

पीटीआय
मंगळवार, 21 जानेवारी 2020

राजकीय वादातून मलेशियातील पाम तेलाची आयात न करण्याच्या भारताच्या निर्णयावर मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहंमद यांनी प्रतिक्रिया दिली असून, भारताच्या कृतीला व्यापारीमार्गाने आम्ही प्रत्युत्तर देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

लंगकावी (मलेशिया)  - राजकीय वादातून मलेशियातील पाम तेलाची आयात न करण्याच्या भारताच्या निर्णयावर मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहंमद यांनी प्रतिक्रिया दिली असून, भारताच्या कृतीला व्यापारीमार्गाने आम्ही प्रत्युत्तर देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताच्या अंतर्गत बाबींसदर्भात महातीर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मलेशियातून होणाऱ्या पाम तेलाच्या आयातीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. त्याचा फटका पाम तेलाचा जगातील दुसरा मोठा उत्पादक असलेल्या मलेशियाला बसू लागला आहे. भारताच्या कृतीबाबत प्रतिक्रिया देताना महातीर म्हणाले की, भारताला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही आकाराने फार लहान देश आहोत. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्हाला मार्ग  शोधावे लागतील.

भारताने नुकतीच मंजुरी दिलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि काश्‍मीरसंदर्भातील धोरणांवर महातीर यांनी जोरदार टीका केली होती. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मलेशियाचे पंतप्रधान असलेल्या महातीर (वय ९४) यांच्या टीकेनंतर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली होती.

वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईकला कायमस्वरूपी मलेशियात वास्तव्याची परवानगी देण्याच्या निर्णयावरूनही भारत  नाराज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malaysia Prime Minister Mahathir Mohamed reacted to India decision