मलेशियालाही हवा 'आधार' 

पीटीआय
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : भारत सरकारने राबविलेल्या आधार मोहिमेपासून प्रेरणा घेत मलेशिया सरकारने त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी भारताचे सहकार्य घेतले जाणार आहे. सरकारच्या कल्याणकारी योजना आणि अनुदान जनतेपर्यंत थेट पोचविण्यासाठी हा बदल करणार असल्याचे मलेशिया सरकारने म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मलेशिया दौऱ्यादरम्यान तेथील सरकारसमोर "आधार'सह विविध मुद्द्यांवर सहकार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मलेशियाच्या मंत्रिमंडळाने चर्चेनंतर हा प्रस्ताव स्वीकारला असून, गेल्या आठवड्यात त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने यासाठी भारत दौराही केला. या शिष्टमंडळाने "आधार'शी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन "आधार'च्या काही वैशिष्ट्यांचा अंगीकार मलेशियाच्या "मायकॅड'मध्ये (ओळखपत्र) करता येईल का, याची चाचपणी केली. भारत सरकारने आधार कार्ड जनतेच्या बॅंक खात्यांना जोडले आहेत. 

मलेशिया सरकारही असे करण्यास तयार असल्याचे या शिष्टमंडळाने सांगितले. आधार कार्डवरील वैयक्तिक माहितीची चोरी होण्याच्या शक्‍यतेवरून भारतात वाद झाला होता, तसा मलेशियातही होण्याची शक्‍यता असल्याबाबत या शिष्टमंडळाला विचारले असता, त्यांनी फारशी अडचण येणार नसल्याचे सांगितले. मलेशियामध्ये ओळखपत्राची पद्धत बऱ्याच वर्षांपासून असून, त्यावर वैयक्तिक माहितीही असते, त्यामुळे फार वाद न होण्याची आशा या शिष्टमंडळाने व्यक्त केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malaysian want aadhaar card