अजबच! गुप्तांग गमावल्यानं हातावर नव्या गुप्तांगाच रोपण अन् पुन्हा लाभलं पौरुषत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malcolm MacDonald_London
अजबच! गुप्तांग गमावल्यानं हातावर नव्या गुप्तांगाच रोपण अन् पुन्हा लाभलं पौरुषत्व

अजबच! गुप्तांग गमावल्यानं हातावर नव्या गुप्तांगाच रोपण अन् पुन्हा लाभलं पौरुषत्व

लंडन : गुप्तांग गमावलेल्या एका पुरुषानं नवं गुप्तांग शस्त्रक्रियेद्वारे हातावर जोडून घेतल्याची अजब घटना लंडनमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे सहा वर्षे या अवस्थेत राहिल्यानंतर या व्यक्तीला पुन्हा पौरुषत्व प्राप्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. न्यूयॉर्क पोस्टनं याबाबत वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, सन २०१० मध्ये इंग्लंडमधील नॉर्फोक येथील रहिवासी असलेल्या ४७ वर्षीय मॅकॉलम मॅकडोनाल्ड यांच्या गुप्तांगाला विशिष्ट प्रकारचं इन्फेक्शन झाल्यानं ते गळून पडलं होतं. यामुळं आपण पुरुषत्व गमावल्याच्या भावनेनं मॅकडोनाल्ड खूपच निराश झाले होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मॅकडोनाल्ड यांच्या डाव्या हातावर एका नव्या माननिर्मित गुप्तांगाचं रोपण करण्याचा निर्णय घेतला होता. पण ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यात अनेक अडचणी आल्या तसेच ऑक्सिजनाच योग्य प्रमाणात पुरवठा होऊ शकत नसल्यानं ही शस्त्रक्रिया अर्ध्यावरच थांबवावी लागली. त्यामुळं हे गुप्तांग त्याच्या हातावर तात्पुरत्या स्वरुपात आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आलं.

हेही वाचा: HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ

दरम्यान, या घटनेनंतर त्याच्या हातावर दुसरी शस्त्रक्रिया करायला खूप उशीरा झाला यासाठी तब्बल ६ वर्षे जावी लागली. त्यानंतर शेवटी २०२१ मध्ये मॅकडोनाल्ड यांच्या हातावरील नऊ तासांच्या शस्त्रक्रियेसाठी अथक प्रयत्नांनंतर मूळ गुप्तांगांच्या जागी हे हाताला जोडलेलं गुप्तांग जोडण्यात आलं. यानंतर काही दिवसात मॅकडोनाल्ड यांना पूर्वीप्रमाणं नॉर्मल पुरुष असल्याचं जाणवू लागलं.

या यशस्वी शस्त्रक्रियेवर प्रतिक्रिया देताना मॅकडोनाल्ड म्हणाले, पुन्हा आपलं लैंगिक जीवन सुरळीत झाल्याचा आनंद आहे. उलट माननिर्मित गुप्तांग हे आपल्या यापूर्वीच्या खऱ्या गुप्तांपेक्षा अधिक चांगलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Malcolm Macdonald Lost His Penis New Attached To Arm Now Is A Real Man Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsLondon
go to top