esakal | मालदीवमध्ये भारतीयांना नो एन्ट्री; कोरोनामुळे घेतला निर्णय

बोलून बातमी शोधा

मालदीवमध्ये भारतीयांना नो एन्ट्री; कोरोनामुळे घेतला निर्णय

विशेषत: बॉलीवूड स्टार्ससाठी हे बेस्ट व्हेकेशन डेस्टिनेशन बनलं होतं. कामातून वेळ मिळाल्यानंतर मालदीवला जाण्याची त्यांना घाईच लागली होती की काय असं वाटत होतं.

मालदीवमध्ये भारतीयांना नो एन्ट्री; कोरोनामुळे घेतला निर्णय
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - जगभरात कोरोनानं थैमान घातलं असताना गेल्या काही महिन्यांमध्ये मालदीवमध्ये मात्र पर्यटन सुरु होतं. विशेषत: बॉलीवूड स्टार्ससाठी हे बेस्ट व्हेकेशन डेस्टिनेशन बनलं होतं. कामातून वेळ मिळाल्यानंतर मालदीवला जाण्याची त्यांना घाईच लागली होती की काय असं वाटत होतं. आता मात्र मालदीवने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीयांना मालदीवला सुट्टी साजरी कऱण्यासाठी जाता येणार नाही.

मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने म्हटलं की, 27 एप्रिलपासून भारतातून येणाऱ्या पर्यटकांना मालदीवमध्ये प्रवेश मिळणार नाही. पर्यटन सुरक्षितपणे व्हावं यासाठी सध्याच्या तुमच्या सहकार्यासाठी धन्यवाद.

मालदीवमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे त्यांनी भारतातून सुट्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश बंदी घातली आहे. याआधी भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्यानं जर्मनी, इटली आणि बांगलादेशनं भारतातून येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश बंदी घातली आहे. जर्मनीत तिथले नागरिक परवानगी घेऊनच भारतातून देशात येऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे. इटलीचे नागरिक भारतात असतील तर ते परत येऊ शकतात. मात्र त्यासाठी कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

हेही वाचा: डोवाल यांच्या कॉलनंतर अमेरिका भारताच्या मदतीला तयार

सध्या बॉलीवूड सेलिब्रिटींच्या मालदीव व्हेकेशनची चर्चा सर्वत्र होत आहे. बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने कलाकारांना यावरून सुनावलेसुद्धा आहे. देशात कोरोनाने परिस्थिती गंभीर बनली आहे. "इथे लोकांना दोन वेळचं जेवण नीट मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाच बाळगा", अशा शब्दांत नवाजुद्दीनने सेलिब्रिटींना फटकारलं होतं.