esakal | 'या' शाळेत चक्क शिक्षक घालतात स्कर्ट; जाणून घ्या कारण
sakal

बोलून बातमी शोधा

'या' शाळेत चक्क शिक्षक घालतात स्कर्ट; जाणून घ्या कारण

'या' शाळेत चक्क शिक्षक घालतात स्कर्ट; जाणून घ्या कारण

sakal_logo
By
शर्वरी जोशी

एखाद्या स्त्रीने जीन्स किंवा ट्राऊझर परिधान केली तर त्यात काही वावग वाटत नाही. आज सर्रास स्त्रिया पुरुषांचा वेश परिधान करत असतात. परंतु, एखादा पुरुष स्त्री वेशात दिसला तर अनेक जण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. किंबहुना त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. परंतु, सध्या सोशल मीडियावर स्पेनमधील (spain) पुरुषांची चर्चा रंगली आहे. इथे एक किंवा दोन नव्हे तर असंख्य पुरुष स्कर्ट घालून फिरत आहेत. विशेष म्हणजे 'कपड्यांना कोणतंही जेंडर नसतं', हे सांगण्यासाठी त्यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. (male-teachers-wear-skirts-to-class-in-order-to-protest-clothes-have-no-gender-of-expelled-student-in-spain)

काही दिवसांपूर्वी स्कर्ट घालून शाळेत आल्यामुळे एका मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळेच या मुलाला पाठिंबा देण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी चक्क स्कर्ट घालून त्याला साथ दिली आहे. सोबतच कपड्यांना कोणताही जेंडर नसतो. हे सांगण्यासाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. सध्या सोशल मीडियावर #ClothesHaveNoGender या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली आहे."आमच्या शाळेतही असा प्रकार घडला होता. एका विद्यार्थ्याने स्वेट शर्ट परिधान केला होता. त्यावेळी त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. अनेकांनी त्याला समलैंगिक म्हणून चिडवलं होतं. अखेर त्या विद्यार्थ्याला कपडे बदलावे लागले होते.त्यामुळेच आम्ही देखील समाजातील हा भेदभाव नष्ट करण्यासाठी या मोहिमेत सहभागी झालो आहोत", असं Borja Velázquez यांनी सांगितलं.

"आमच्या शाळेतही असा प्रकार घडला होता. एका विद्यार्थ्याने स्वेट शर्ट परिधान केला होता. त्यावेळी त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. अनेकांनी त्याला समलैंगिक म्हणून चिडवलं होतं. अखेर त्या विद्यार्थ्याला कपडे बदलावे लागले होते.त्यामुळेच आम्ही देखील समाजातील हा भेदभाव नष्ट करण्यासाठी या मोहिमेत सहभागी झालो आहोत", असं Borja Velázquez यांनी सांगितलं.

हेही वाचा: 'संजू'चे कष्ट अख्खा महाराष्ट्र बघतोय, पण..; श्रुती अत्रेची भावनिक पोस्ट

स्कर्ट परिधान करुन सोशल मीडियावर फेमस व्हावं हा आमचा उद्देश नाही. मात्र, समाजातील भेदभाव दूर व्हावा आणि सहिष्णुता वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं Manuel Ortega यांनी सांगितलं.

दरम्यान, Jose Piñas हे गेल्या एक वर्षापासून शाळेत स्कर्ट घालून येत आहेत. इतकंच नाही तर आता शाळेतल्या विद्यार्थ्यांनीही त्यांना सपोर्ट दिला आहे. विद्यार्थीदेखील स्कर्ट घालून शाळेत येऊ लागले आहेत.