China Covid Update | चीनमध्ये कोरोना वाढला, मॉल्स बंद, तर लॉकडाऊन आणखी कडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus china

चीनमध्ये कोरोना वाढला, मॉल्स बंद, तर लॉकडाऊन आणखी कडक

चीनमध्ये कोरोना महामारीचा उद्रेक पाहता प्रशासनाने आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. राजधानी बीजिंगमध्ये प्रशासनाने अनेक मॉल्स सील केले आहेत. लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोना महामारीचा पहिला उद्रेक झाल्यापासून चीन कठोर नियमांचा अवलंब करत आहे. जगातील सर्वात कडक लॉकडाऊन चीनमध्येच लागू करण्यात आला आहे. मात्र, असं असतानाही अनेक वेळा साथीचे आजार पसरले आहेत.

राजधानी बीजिंगमध्ये गुरुवारी कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने कडक पावलं उचलली. स्थानिक माध्यमांनुसार, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आले आहे. तसेच ज्या गृहसंकुलांमध्ये बाधित रुग्ण आढळले आहेत, त्या जागा सील करण्यात आल्या आहेत.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचा दावा आहे की चीनमध्ये बाहेरून येणाऱ्या प्रकरणांमुळे कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. अशा परिस्थितीत रशियाला लागून असलेल्या शहरांमध्ये कोरोना संसर्गाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे की जो कोणी कोरोना संशयित किंवा संक्रमित व्यक्तीचा शोध घेण्यास मदत करेल, त्याला एक लाख युआन म्हणजेच 15 हजार 500 डॉलर्स बक्षीस म्हणून दिले जातील.

loading image
go to top