कोरोनापासून बचाव होण्यासाठी बनवले फुग्यांचे कवच...

वृत्तसंस्था
Thursday, 30 July 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.

सिडनी (ऑस्ट्रेलिया): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. यासाठी अनेकजण विविध प्रकारचे जुगाड करताना दिसतात. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video: भाज्या सॅनिटाइझर करणारे इंडियन जुगाड

ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने कोरोनापासून बचाव होण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी चक्क फुग्याचा वापर केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका युवकाने स्वतःला फुग्यामध्ये बंद करून घेतले आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होण्याबरोबरच कोरोनाच्या विषाणूपासून बचाव होत आहे, असे त्या युवकाचे म्हणणे आहे.

बेलग्रेड या शहरामधील युवकाने ही भन्नाट युक्ती वापली असून, अनेकजण आश्चर्यचकित होऊन पाहात आहेत. या युवकाने हवाबंद असलेल्या फुग्यामध्ये स्वत:ला बंद करून घेतले आणि रस्त्यावरून चालू लागला. यामुळे नागरिकांनी घाबरून ओरडायला सुरुवात केली. काहीजण गंमत म्हणून हसत होते. काही जण मोबाईलमध्ये कैद करत होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

Video: इमारत पाच सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man jugaad to escape the corona virus video viral