esakal | ३७ व्या लग्नाची गोष्ट; २८ बायका, १३५ मुलं अन् १२६ नातवंडांचं वऱ्हाड!
sakal

बोलून बातमी शोधा

३७ व्या लग्नाची गोष्ट; २८ बायका अन् १२६ नातवंडांचं वऱ्हाड!

३७ व्या लग्नाची गोष्ट; २८ बायका अन् १२६ नातवंडांचं वऱ्हाड!

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राजा-महाराजांच्या लग्नांचे अनेक किस्से आणि गोष्टी ऐकल्या असतील. 21 व्या शतकात असे अनेक समाज आहेत, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त लग्न करण्याची प्रथा आहे. तेही दोन-चार लग्नापर्यंत मर्यादीत आहे. सध्याच्या आधुनिक युगामध्ये एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा अटाहासही कोणी करत नाही. सध्याच्याच या युगात एखाद्या व्यक्तीनं 37 व्यांदा लग्न केल्यानंतर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा करण्यात आलाय की, एक वयोवृद्ध व्यक्ती 37 व्यांदा लग्न करत आहे. त्याच्या लग्नात 28 बायका, 135 मुलं आणि 126 नातवंडाचं वऱ्हाड उपस्थित होतं.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ आयपीएस आधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. 45 सेंकदाच्या व्हिडिओमध्ये लग्नामधील उत्साह दिसत आहे. शर्मा यांनी व्हिडिओ पोस्ट करताना लिहिलेय की, सर्वात धाडसी व्यक्ती! 28 बायका आणि 135 मुलं आणि 126 नातवंडासमोर विवाह लग्न केलेय.

रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ कधी आणि केव्हा शूट करण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं नाही. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: मुंबई-दिल्लीमध्ये तिसरी लाट नाही, तज्ज्ञांनी सांगितलं कारण