माथेफिरूचा निर्दयीपणा; गाडीला बांधून जिवंत कुत्र्याला नेले शहरभर फरफटत

kazakhstan Man ties dog to his car drags
kazakhstan Man ties dog to his car drags

कजाकिस्तान : कुत्रा या प्राण्याला बरेच जण घाबरतात. तो चावेल या भीतीने त्याच्या जवळ जायची भीती अनेकांना वाटते. काही लोकांना कुत्र्याबद्दल विशेष प्रेम असते. अनेकांच्या घरात कुत्रा पाळलेला दिसतो. मुक्या प्राण्यांची  काहींना भीती वाटते तर काही लोक त्यांना दत्तक घेऊन त्याची देखभाल करतात. जे लोक कुत्र्यांचा सांभाळ करतात ते अगदी कुटुंब सदस्यासारखी  त्याची काळजी घेतात. त्यांच्यासाठी विशेष प्रकारचे खाद्य देखील आणतात. 

जिवंत कुत्र्याला गाडीला बांधून फरफटले
काही माथेफिरू लोकांनी  प्राण्यांवर अत्याचार केल्याचे व्हिडिओ व फोटोज् व्हायरल होत असतात. अश्या अत्याचारामुळे त्या प्राण्यांचा जीव जातो अथवा त्याला गंभीर दुखापत होते. अशीच एक घटना कझाकिस्तानमध्ये घडली आहे. एका माथेफिरुने कुत्र्याला आपल्या चारचाकी गाडीच्या मागे बांधले आणि पूर्ण शहरभर फरफटत नेले. हे दृश्य रस्त्यावरील एका दुचाकीस्वार नागरिकाने पाहिले. नागरिकाने चारचाकी थांबण्यासाठी  हॉर्न वाजवत त्या गाडीचा पाठलाग केला. गाडी रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर त्या माणसाला त्याने विचारले की "तू हे काय करत आहेस?" काहीही उत्तर न देता त्या माथेफिरूने गाडीला लटकवलेल्या कुत्र्याला रस्त्याच्या बाजूला ठेवले व गाडीत बसून तो निघून गेला. ज्या रस्त्यावरून त्या कुत्र्याला फरफाटत नेले, त्या पूर्ण रस्त्याला रक्त लागले होते असे त्या नागरिकाने सांगितले. 'इंडिया टाइम्स'च्या म्हणण्यानुसार ही घटना 7 जानेवारीला घडली आहे. गाडीने फरफटल्याने कुत्र्याच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या पुढच्या पायाला खूप लागले आहे. कुत्र्याचे शरीर रक्ताने माखले आहे. 

कृषी कायद्यांना स्थगिती, समितीची स्थापना; शरद पवार म्हणतात, हा निर्णय म्हणजे...
 
kind hearts आले मदतीला धाऊन 
kind hearts नावाचा ग्रुप प्राण्यांच्या मदतीला नेहमी पुढे असतो. या कुत्र्यावर kind hearts च्या व्हॉलेंटीअर्सनी प्राथमिक उपचार केले. या घटनेची संपूर्ण माहिती सोशल मीडियावर kind hearts च्या व्हॉलेंटीअर्सनी पोस्ट केली आहे. त्या कुत्र्याला पेन किलरच्या गोळ्या देण्यात आल्या व त्याच्या जखमांवर औषध लावण्यात आले आहे. त्या गाडीच्या ड्राइवरचा शोध पोलीस घेत आहेत.

ग्लोबल

अमेरिका

साऊथ आशिया

आशिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com